जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण!

जळगाव(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धुन वाजविली.
लसीकरणासाठी तरूणांनी घाई न करण्याचे आवाहन
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण आजपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी आपली नोंदणी कोविन ॲपवर करावी. ज्यांची नोंदणी होईल त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यांनी केंद्रावर जाऊन लस घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हावासियांना केले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनावर मात करेल असा विश्वासही त्यांनी कार्यक्रमानंतर बोलतांना व्यक्त केला.
