जी. एस. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी डिगंबर महाले

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी तेथील पर्यवेक्षक डिगंबर महाले यांना ३० रोजी मुख्याध्यापक पदाची पदोन्नती मिळाली आहे.
तेथील मुख्याध्यापक प्रकाश मेखा हे निवृत्त झाल्याने त्या रिक्त जागी श्री. महाले यांची नियुक्ती झाली आहे. श्री.महाले हे ज्येष्ठ पत्रकार, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत ते २१ वर्षे संस्थेचे बिनविरोध शिक्षक प्रतिनिधी होते. ते जी.एस. हायस्कूलचेच माजी विद्यार्थी असून ते त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच शाळेचे पर्यवेक्षक झाले व त्याच शाळेत आता मुख्याध्यापक पदी विराजमान झाले आहेत.
त्यांचे संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.