गुरुवार, एप्रिल 2021

▶️ इंग्लंडमधील साऊथहॅम्पटन येथे भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारे न्यूझीलंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंडला प्रवास करण्याची शक्यता

▶️ कोविड प्रतिबंध लसीकरणाचा निर्णायक टप्पा १ मेपासून सुरू होत असताना, मर्यादित साठा उपलब्ध असल्याने ही मोहीमच अडचणीत आली आहे. लसींचा साठा संपुष्टात आला असल्याने अनेक केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही.

▶️ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची आपल्याविरुद्धची तक्रार खोटी असून, शासनाने या प्रकरणाची लवकर सुनावणी घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी केली.

▶️ कोरोनामुळे संकटात सापडलेल्या भारताला कॅनडाने १ लाख कोटी डाॅलरची मदत देणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची ही माहिती दिली.

▶️ राज्यात बुधवारी 63,309 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 61,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के इतके झाले आहे.

▶️ गोवा सरकारनेही आपल्या राज्याच्या अखत्यारीत 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कर्नाटकपाठोपाठ लॉकडाऊन उपायाचा अवलंब करणारे ते दुसरे भाजपशासित राज्य ठरले आहे.

▶️ आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाने हैदराबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला हैदराबाद संघाने दिलेले 171 धावांचे लक्ष चेन्नई संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

▶️ केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ही Y दर्जाची सुरक्षा संपूर्ण देशभरात पुरवली जाईल.

▶️ दिल्लीच्या प्रत्येक प्रशासकीय निर्णयासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उपराज्यपालांची अनुमती घ्यावी लागणार आहे. तसे विधेयक केंद्रीय गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!