कोरोना काळात मानसशास्त्रज्ञीय काही सूचना

१. विषाणूच्या बातम्यांपासून स्वतःला दूर ठेवा. (याबद्दल आपल्याला जे जे माहिती असायला हवं ते एव्हाना माहिती झालेलं आहे).
२. कितीजण दगावले ते पाहत बसू नका. ही एखादी क्रिकेट मॅच नाही की ज्याचा लेटेस्ट स्कोर काय झाला ते तुम्हाला माहिती असायलाच हवं, त्यामुळे याकडे लक्ष देणे पूर्णपणे टाळा.
३. इंटरनेटवर अधिक माहिती शोधू नका, याने तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.
४. गंभीर मेसेजेस इतरांना पाठवणे त्वरित थांबवा. तुम्ही जितके मनाने खंबीर असाल तितकीच खंबीर समोरची व्यक्ती असेलच असे नाही (याने मदत तर होणार नाहीच उलट तुम्ही समोरच्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकता).
५. शक्य झाल्यास घरात शांत मंद आवाजात आवडते संगीत ऐका. लहानग्यांशी खेळ खेळा, त्यांना छान छान गोष्टी सांगा भविष्यात काय काय करणार याविषयी चर्चा करा.
६. घरात वारंवार हात धुण्याची सवय लावून घ्या, त्यासाठी सर्वांसाठी गजर लावून ठेवा.
७. तुमचा सकारात्मक मूड तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो, परंतु तोच मूड नकारात्मक असेल तर तीच रोगप्रतिकारक शक्ती मंदावते आणि विषाणूशी लढा देण्यास कमकुवत ठरते.
८. सर्वात महत्वाचे, हे सगळं एक ना एक दिवस टळणार आहे आणि आपण सर्वजण सुरक्षित होणार आहोत हे ध्यानात ठेवा…. !
९. तुमचे भविष्यातील आखाडे काय असतील त्यावर लक्ष केंद्रित करा , हीच ती योग्य वेळ आहे जीचा सदुपयोग तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे काय आहेत त्यावर विचार करण्याची..
१०. विनोदी चित्रपट, साहित्य पहा कारण विनोदाने बराच ताणतणाव कमी होतो आणि ते एक उत्तम औषध आहे.
सकारात्मक राहा, सुरक्षित राहा.
✍? डॉ संदीप जोशी, प्रसिध्द हृदय रोगतज्ज्ञ, अमळनेर