भा.ज.पा.युवा मोर्चाची अमळनेर शहर कार्यकारणी जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची अमळनेर शहर कार्यकारणी मोर्चाचे शहराध्यक्ष पंकज भोई यांनी घोषित केली.यात उपाध्यक्ष:- 7, सरचिटणीस:-2,चिटणीस:-8,प्रसिद्ध प्रमुख:2,सोशल मीडिया प्रमुख:1 असून कार्यकारणी सदस्य 51आहेत असे एकूण 71 युवक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून असलेल्या युवा मोर्चाची कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष पंकज भोई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यात उपाध्यक्षपदी गौरव अशोक महाजन,शुभम प्रदीप पाटील,सुमित बापू हिंदुजा,गौरव कैलास सोनार,कमलेश जयतीलाल वानखेडे,राजगुरू महाजन,समाधान वसंत केदार यांची निवड करण्यात आली आहे.सरचिटणीसपदी राहुल चौधरी,समाधान पाटील यांची निवड झाली आहे.
चिटणीस म्हणून नितीन रामकृष्ण पवार,गजानन जगन्नाथ पाटील,अशोक भगवान पाटील,भूषण नानाजी पाटील,शुभम अशोक बडगुजर, दिनेश राजू जाधव,शिवकिरण बापू बोरसे,रितेश चिकाटे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यासह कोषाध्यक्ष मुशाईद फैजोदिन शेख,यांची तर प्रसिद्ध प्रमुखपदी स्वप्नील भारत भावसार,सहप्रसिद्ध प्रमुख सौरभ लोटन पाटील, सोशल मीडिया प्रमुखपदी आकाश डी. माळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नूतन कार्यकारणीला पुढील वाटचालीस आणि पक्षाचे काम दिवसेंदिवस जोमाने करावे म्हणून मा.आ.स्मिताताई वाघ,ॲड.ललिताताई पाटील,प्रदेश संयोजक ॲड.व्ही.आर. पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस राकेश पाटील, विजय राजपूत,माजी शहराध्यक्ष शितल देशमुख यांनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.