प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

गुरुवार, 22 एप्रिल 2021
▶️ ब्रेक द चेन अंतर्गत आजपासून 1 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, लग्न 25 जणांत व 2 तासांत उरकावं लागणार
▶️ महाराष्ट्रात 6,95,747 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 32,68,449 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 61,911 रुग्णांचा मृत्यू
▶️ रेमडेसिवीरऐवजी गोळ्यांची भुकटी भरून दिली, मुंबईतील चेंबूर येथील महिलेची केली फसवणूक; मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड
▶️ केंद्र सरकारने उद्योगांना जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ थांबवावा, उद्योग ऑक्सिजनची वाट पाहू शकतात, रुग्ण नाही; दिल्ली हायकोर्टाचे निर्देश
▶️ आयपीएल 2021: चेन्नईने कोलकाताला 18 धावांनी केले पराभूत, चेन्नईने दिले होते 221 धावांचे आव्हान; प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 202 धावांवर ऑल आऊट
▶️ नाशिक ऑक्सिजन गळती: मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत केली जाहीर; नाशिक महापालिकेकडूनही प्रत्येकी 5 लाखांची मदत, पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
▶️ भारतात 22,84,248 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,34,49,406 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,84,672 रुग्णांचा मृत्यू
▶️ देशात कोविड लसीकरणाचा वेग कायम, 13 कोटी जणांना 95 दिवसांत देण्यात आली लस, कोव्हिशिल्ड लशीचा सर्वाधिक वापर; आरोग्य मंत्रालयाची माहीती
▶️ राज्यात नव्याने लागू केलेल्या निर्बंधांमुळे हिंदीनंतर आता मराठी मालिकांचेही राज्याबाहेर चित्रीकरण; गोवा, हैदराबाद, कर्नाटक येथील सुरक्षित स्थळांना पसंती
▶️ लॉकडाऊनमुळे कौटुंबिक वादातून पती-पत्नींमध्ये दुरावा, सोलापुरात 91 जोडप्यांचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने सर्वच प्रकरणे प्रलंबित