मंगळवार, 20 एप्रिल 2021

▶️ महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावायचा की सध्याचे निर्बंध आणखी वाढवायचे, येत्या 2 दिवसांत निर्णय होणार; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

▶️ महाराष्ट्रात 6,76,520 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 31,59,240 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 60,824 रुग्णांचा मृत्यू

▶️ 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; लस घेण्यासाठी कोविन ॲपवरुन नोंदणी करावी लागणार

▶️ आयपीएल 2021 : चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 189 धावांचे दिले होते आव्हान; पराभव झालेला राजस्थान रॉयल्स 20 ओव्हरमध्ये 9 बाद 143 धावा करू शकला

▶️ भारतात 20,24,629 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,31,03,220 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,80,550 रुग्णांचा मृत्यू

▶️ महाराष्ट्रासाठी ‘ऑक्सीजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना, पाच दिवसांत रेल्वेने येणार 110 टन द्रवरूप ऑक्सीजन, रेल्वेमार्गावरुन ऑक्सीजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

▶️ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कमाल अन्सारीचा कोरोनाने मृत्यू, नागपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार; बॉम्बस्फोट खटल्यात सुनावण्यात आली होती फाशीची शिक्षा

▶️ कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सना ॲम्बुलन्सचा दर्जा, वाहतूक कोंडीमुळे, टोलनाक्यांवरील रांगांमुळे विलंब होत असल्याने निर्णय

▶️ देशातील एकूण रुग्णांपैकी 40% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात, 30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवे; मुंबई उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

▶️ शिवसेना-भाजप वाद: बुलडाण्यात भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर बुलडाण्यात दगडफेक, काही काळ पसरले होते तणावाचे वातावरण

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!