डॉ. योगेश सूर्यवंशी व दिनेशभाई रेलन यांची धुळे ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड!

धुळे (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी धुळे यांच्या पत्रान्वये जिल्ह्यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 7 व 8 ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद वर 12 शासकीय सदस्य शासनाने निश्चित करून दिलेले असून उर्वरित 28 अशासकीय सदस्यांमध्ये शासनाने गठीत केलेल्या धुळे जिल्हा निवड समितीमार्फत डॉ. योगेश हिंमतराव सूर्यवंशी आणि दिनेश सुभाष रेलन यांची सदरच्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहेत.
डॉ. योगेश सूर्यवंशी हे ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांच्या पठडीत तयार झालेले असून आपले आयुष्य त्यांनी ग्राहक पंचायतीला समर्पित केले आहे तसेच डॉ. योगेश सूर्यवंशी हे संपूर्ण धुळे जिल्ह्याला परिचित असून वृत्तपत्रांमध्ये अनेक ग्राहक प्रबोधन पर लेख लिहिलेले आहेत तसेच ग्राहक मिळावे, रेडिओ,टीव्ही, शाळा, कॉलेज आणि ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थी व शेतकरी सर्व स्तरावर त्यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीबाबत गेल्या 35 वर्षांपासून जनजागृती करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. डॉ. सूर्यवंशी हे यशदा पुणे येथील विविध कायद्यांचे मास्टर ट्रेनर आहेत. त्यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध कायद्याचे प्रशिक्षण दिलेला आहे,तसेच ग्राहक कायद्यांवर तसेच त्यांचे चांगले प्रभुत्व असून ते पीडित ग्राहकांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवतात.अनेक ग्राहकांना ते मोफत मार्गदर्शन करीत असतात. त्यांचे कार्य बघून प्रशासनाने डॉ. योगेश सूर्यवंशी यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली तसेच दिनेश सुभाष रेलन यांचे ग्राहक संरक्षण परिषद वर अशासकीय सदस्य नियुक्ती केली आहे. दिनेश रेलन हे ग्राहक पंचायत मध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करीत असून अनेक शाळा आणि महाविद्यालय तसेच मेळांव्यामध्ये ग्राहक प्रबोधन केलेले आहे.
त्या दोघांची जिल्हाधिकारी संजय यादव,निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड,नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. मार्तंडराव जोशी,धुळे जिल्हा अध्यक्ष अँड. जे.टी देसले आणि कार्यकारी अध्यक्ष रतनचंद शहा यांनी अभिनंदन केले आहे.