आ.अनिल पाटील यांना पितृशोक; सांत्वन घरूनच करा,भावनिक आवाहन!

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बु.येथील रहिवासी तथा सा.बां.विभागाचे निवृत्त अभियंता व आमदार अनिल पाटील यांचे वडील भाईदास संतोष पाटील यांचे वयाच्या 86 व्या वर्षी आज दि 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजता वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अमळनेर येथेच आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यावेळी आमदार पाटील यांनी आवाहन केले आहे की, आजपर्यंत आमचे सर्व नातलग,हितचिंतक आणि तमाम नागरिक आमच्या सर्व सुख दुःखात सहभागी होत आले आहेत,परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती वेगळी असल्याने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे सर्वाना हात जोडून विनंती आहे की कृपा करून कुणीही अंत्ययात्रेत सहभागी होऊ नये अथवा सांत्वनासाठी घरी भेटीसाठी येऊ नये, सर्वांनी आहे त्या ठिकाणाहुन, घरूनचं वडिलांना श्रद्धांजली अर्पण करावी,ही आग्रहाची नम्र विनंती.