प्रजाराज्य न्यूज- हेडलाईन्स

शनिवार,17 एप्रिल, 2021
▶️ कोरोना काळात मोठा दिलासा; शुक्रवारी पुण्यासाठी सुमारे 4 हजार 311 रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा झाला उपलब्ध
▶️ आयपीएल: चेन्नईचा पंजाबवर 6 विकेट्सने विजय; आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईची दुसऱ्या क्रमांकावर उडी!
▶️ गुजरात सरकारकडून करोनाविषयक चाचण्या आणि करोनाबाधितांच्या संख्येबाबत दिला जाणारा तपशील अचूक नसल्याचा जनतेत समज; तो दूर करण्यासाठी खरी आकडेवारी द्या, गुजरात उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
▶️ भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून तीन मजुरांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू; तर तीन मजूर जखमी
▶️ आयपीएलच्या आठवणी सांगताना चेन्नईच्या विजयानंतर धोनी म्हणाला ‘2008 पासूनचा प्रवास आठवताना मला म्हातारा झाल्यासारखं वाटतं, खूप लांब प्रवास आहे हा’
▶️ कोरोना लसीकरण: रोज जीवाची बाजी लावून काम करणारे एसटी कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये का नाहीत? म्हणत, एसटी कर्मचाऱ्यांचे सरसकट लसीकरण झाले नाही तर आंदोलन करू; एसटी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा!
▶️ नाशकात मद्यपींना आता घरपोच दारु मिळणार; पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लायसन्स आवश्यक, नाशिक जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांची माहिती!
▶️ शुक्रवारी बीड येथील नाळवंडी रस्त्यावर असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू, धक्कादायक घटनेने जिल्हा हादरला
▶️ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या बेजबाबदार कोविडप्रसारकांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची अमरावती जिल्हा प्रशासनाची धडक मोहिम; भर चौकात केल्या जातायत कोरोना चाचण्या
▶️ देशात यंदा मान्सून 96 टक्क्यांपासून 104 टक्क्यांपर्यंत, महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी होणार, हवामान खात्याकडून पहिला मान्सून अंदाज जाहीर