शिवदास पाटील यांचे दुःखद निधन

अमळनेर-तालुक्यातील धार येथील प्रगतिशील शेतकरी शिवदास ओंकार पाटील वय-72 यांचे दि.15 रोजी सायंकाळी 5 वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, 2 मुली, सूना, नातवंडे असा परीवार असून त्यांच्यावर धार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते धार वि.का.सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक एच.एस.पाटील यांचे वडील होते.