“माझ्या महाराष्ट्रासाठी,मी रक्तदान करणार”अभियानांतर्गत राष्ट्रवादी ग्रंथालय सेल तर्फे अमळनेरला रक्तदान शिबीर

सौ.रिता बाविस्कर यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन !
अमळनेर (प्रतिनिधी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्या आव्हाना नुसार नामदार जयवंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या वतीने अमळनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी रक्तदान केले. यावेळी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक तसेच प्रदेश सचिव रिता बाविस्कर, अंकूश ज्ञानेश्वर भागवत (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव) युवक शहराध्यक्ष इम्रान खाटीक,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रफिक शेख, शहर उपाध्यक्ष मुशिर शेख , शहर कार्याध्यक्ष युवक उमेश सोनार धुळे ग.स. बॅंक संचालक भुपेंद्र बाविस्कर, महिला तालुका अध्यक्षा योजना पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष ग्रंथालय विभाग, नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ग्रंथालय विभाग जळगाव संभाजी पाटील, वडगाव, गजेंद्र साळुंखे, युवक जिल्हा उपाध्यक्ष निनाद शिसोदे,मनोज शिंगाणे, शरीफभाई ,युवक पदाधिकारी दर्पण वाघ, शहरध्यक्ष रणजित पाटील,अरुण शिंदे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया राहुल गोत्राळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डीस्टेनसींग चे पालन करून उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन सौ.रिता बाविस्कर यांनी केले तसेच याप्रसंगी रिताताईचे चिरंजीव ललित बाविस्कर यांनी पहिल्यांदा रक्तदान केले.याप्रसंगी योगेश सोनार,भुषण ठाकुर, भटु लोहार, कल्पेश बारी,रोहित ताबंट,प्रशांत काटे, शारुख पठाण, पप्पु पठाण,दिपक बाविस्कर, दिपक पाटील, नथ्थु पौर,निलेश पाटील,गुलशन कुमार पारधी, अभिषेक शिंपी,शुभम बोरसे, भुवन्य पाटील, प्रतीक बोरसे , चिन्मय पाटील,कृणाल चौधरी,भाग्येश पाटील,विजय पाटील,रोहित सोनवणे तसेच मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.
