प्रजाराज्य न्यूज हेडलाईन्स

बुधवार,14 एप्रिल 2021
▶️ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
▶️ महाराष्ट्रात 5,93,042 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 28,66,097 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 58,526 रुग्णांचा मृत्यू
▶️ अँटिलिया प्रकरण: मनसुख हत्याकांडमध्ये ATS ने तपासले 9 हजार फोन नंबर; मनसुखच्या अखेरच्या कॉलच्या साहाय्याने एका बार गर्लपर्यंत पोहोचली ATS
▶️ आयपीएल 2021 : मुंबईचा संघ 152 धावांवर ऑलआऊट, प्रत्युत्तरात कोलकाताने 7 विकेट गमावून 142 धावा केल्या; अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी
▶️ भारतात 13,60,867 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,23,32,688 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,72,115 रुग्णांचा मृत्यू
▶️ अदानी ग्रुपला दणका: अमेरिकेच्या बाजाराने अदानी पोर्ट्सला निर्देशांकातून वगळले, म्यानमार सैन्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप
▶️ पुणे म्हाडाची 2 हजार 890 सदनिकांसाठी लॉटरी, इच्छूकांचे अर्ज 14 मे पर्यंत स्वीकारले जाणार; सदनिकांची ऑनलाईन सोडत 29 मे रोजी काढणार
▶️ बिहार: बिहारच्या आरा येथे दुहेरी हत्याकांड; वृद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी तरुणाला जिवंत पेटवले, पोलिसांची मध्यस्थी
▶️ महाराष्ट्रासह देशभरात मोसमी पावसाचे प्रमाण यंदा सर्वसाधारण, दीर्घकाळ सरासरीच्या 103% पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होण्याचा ‘स्कायमेट वेदर’चा अंदाज
▶️ ‘पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार, आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 45 हून अधिक पुरस्कार