प्रजाराज्य न्यूज हेडलाईन्स

मंगळवार,13 एप्रिल 2021
▶️ अँटिलिया प्रकरण: राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपास पथकाचे नेतृत्व करत असलेले महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली
▶️ वैद्यकीय शिक्षण विभाग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील 72 तासांत निर्णय; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले स्पष्ट
▶️ महाराष्ट्रात 5,64,746 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 28,34,473 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 58,245 रुग्णांचा मृत्यू
▶️ अहमदनगर : कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने नगर जिल्ह्यात लसीकरण ठप्प; दोन दिवसांत 35 हजार डोस मिळणार असल्याची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती
▶️ 100 कोटींचे आरोप: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून समन्स, अनिल देशमुख यांची बुधवारी चौकशी होणार
▶️ भारतात 12,58,906 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,22,50,440 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,71,089 रुग्णांचा मृत्यू
▶️ आयपीएल 2021 : पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा केला 4 धावांनी पराभव; पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 221 धावा, प्रत्युत्तरात राजस्थानच्या 5 बाद 217 धावा
▶️ सरकारकडून गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याची सूचना; प्रभातफेरी, बाइक रॅली व मिरवणुकांना मनाई
▶️ ग्राहकांची फसवणूक थांबणार, कोकण हापूसच्या नावाखाली इतर आंबे विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार; मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने जारी केले परिपत्रक
▶️ पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ‘डीपीसी’तून 208 कोटी मिळणार; जम्बो सेंटरमध्ये सुविधा, कोरोना केअर सेंटर उभारणीवर खर्च करणार