नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याची सद्बुद्धी देवो!-भीमराव महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी अमळनेर तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटना व संघटनेच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी अमळनेर शहरातील धुळे रोड येथील पन्नालाल चौक येथे व्हावे,अशी वेळोवेळी निवेदने देऊन मागणी केली आहे.सदर मागणीचा अजूनही नगर परिषदेच्या राजकीय व शासकीय पदाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतला नाही तरी आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ जयंती आहे त्यानिमित्ताने मी निर्मिक चरणी प्रार्थना करतो की,अमळनेर नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक करण्याची सद्बुद्धी देवो,असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा सदस्य भीमराव महाजन यांनी केले.शासनाचे सर्व नियम व अटी पाळून महात्मा ज्योतिबा फुले यांना उपस्थित समाज बांधवानी अभिवादन केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग नामदेव महाजन,क्षत्रिय माळी समाज मंडळ महाराष्ट्र ,मध्य प्रदेश,गुजरातचे सचिव मनोहर भगवान महाजन,नगरसेवक देविदास भगवान महाजन,माळी समाजाचे सचिव कैलास गजानन महाजन, मेडिकल असोसिएशनचे सहसचिव प्रवीण महाजन,बापू सुका महाजन,समता परिषद शहराध्यक्ष प्रताप पाटील,दिनेश गंगाराम महाजन,हेमंत महाजन,सोनु महाजन कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग महाजन,संत सावता माळी सेवा मंडळाचे रवींद्र महाजन,युवराज महाजन,चेतन महाजन,चंद्रकांत महाजन,