प्रा.गुणवंत पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप कनिष्ठ महाविद्यालयात रसायशास्त्र विभागातील प्राध्यापक गुणवंत भालेराव पाटील हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे तर्फे 27/12/2020 घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ते तालुक्यातील एकलहरे गावाचे रहिवाशी आहेत.
त्यांचे खा. शि. मंडळाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील तसेच सदस्य निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल,संदेश गुजराथी , डॉ.बी. एस.पाटील, तसेच प्राचार्या डॉ. सौ. ज्योती राणे उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.