पारोळा येथे झुलेलाल जयंती चेट्रीचंड्र सिंधी दिवस उत्सव रद्द!

▶️ पारोळा सिंधी पंचायतची माहिती
पारोळा(प्रतिनिधी) सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जंयती चेट्रीचंड्र सिंधी दिवस दि,१३ एप्रिल रोजी असुन हा उत्सव संपुर्ण जगात भगवान झुलेलाल (वरूण देवता) यांची जंयती चेट्री चंड्र सिंधी दिवस म्हणुन संपुर्ण विश्वातील सिंधी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील वर्षापासून या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे.मागील वर्षी ही कोरोना मुळे सिंधी समाजाचा हा उत्सव साजरा झाला नाही,म्हणून संपूर्ण समाजात निराशेचे वातावरण होते, पूर्ण वर्षात हा एकमेव दिवस असतो जो संपर्ण जगात विखुरलेल्या सिंधी समाजाला एकतेचा संदेश देत असतो परंतु कोरोनामुळे या उत्साहात ही विरजण पडले आहे,
या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार म्हणून संपुर्ण भारतात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती परंतु देशातील अनेक भागात या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक राज्यात भगवान झुलेलाल यांची जयंती चेट्री चंड्र सिंधी दिवस हा उत्सव रद्द करण्यात आला आहे,याच पार्श्वभुमीवर राज्य सरकारच्या निर्बंधनाने पारोळा येथील ही भगवान झुलेलाल जंयती उत्सव चेट्रीचंड्र सिंधी दिवस हा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती पारोळा सिंधी पंचायतचे अध्यक्ष शंकर हिंदुजा यांनी दिली आहे,समस्त सिंधी समाजाने आपापल्या घरात राहुन भगवान झुलेलाल यांची आरती व प्रार्थना करून संपुर्ण जगात पसरलेली कोरोना महामारी ही लवकरात लवकर नष्ट होण्याची प्रार्थना करावी,असे आवाहन समस्त सिंधी समाजाला जय झुलेलाल सिंधी पंचायत पारोळाच्या वतीने करण्यात आले आहे.