डॉ.पृथ्वीराज पाटील यांची स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड!

पारोळा (प्रतिनिधी) शिर्डी येथे शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रभारी वर्किंग कमिटीची संघटन आढावा बैठक 1 एप्रिल 2021 रोजी संपन्न झाली, याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे वर्कींग कमिटीचे अध्यक्ष भगवानराव बोराडे, अनंत सादडे, गोकुळ पाटील, विजय ताकवने, डॉ.पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते, याप्रसंगी डॉ.पृथ्वीराज पाटील यांना स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रमुख वर्किंग कमिटी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाचे नियुक्ती पत्र स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, याप्रसंगी चिंतन बैठकीत संघटन बांधणीचा आढावा घेऊन, 2024 सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीने पुढील काळात पक्षाचं कामकाज मोठ्या प्रमाणात सक्रिय करण्याचे ठरविले आहे.
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख व श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळीचे संस्थापक अध्यक्ष, डॉ.पृथ्वीराज पाटील यांची शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल व पारोळा तालुक्यातील शेतकरी कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचा माणूस मिळाल्याबद्दल शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष व तालुक्यातील कष्टकरी शेतकरी वर्ग व सर्व सामान्य जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.