आ.अनिल पाटील झालेत कोरोना बाधित;प्रकृती उत्तम,संपर्कात आलेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन!

0

अमळनेर(प्रतिनिधी)कोरोनाच्या विळख्यातुन भले भलेही सुटत नसताना अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील देखील यातून सुटले नसून त्यांची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तातडीने उपचार घेऊन त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेटेड करून घेतले आहे.मात्र फारसी लक्षणे नसल्याने त्यांची प्रकृती उत्तमच आहे.
दरम्यानच्या काळात जे कोणी हितचिंतक, कार्यकर्ते अथवा इतर मंडळी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी तातडीने आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदारांनी केले आहे.दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांची तोंडाची चव बदलून त्यांना थोडे बदल जांणवल्याने त्यांनी तातडीने प्रसिद्ध डॉ संदीप जोशी यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या सल्ल्याने एचआरसीटी तपासणी करुन घेतले त्यात नॉर्मल लक्षणे दिसून आली त्यानंतर दोनदा अँटीजन चाचणी केली असता दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात,यामुळे डॉ संदीप जोशी यांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करून त्यांच्या घरीच स्वतःला आयसोलेटेड त्यांनी करून घेतले आहे.फारसी लक्षणे नसल्याने व त्वरित तपासणी आणि उपचार सुरू केल्याने लवकरच ते यातून बरे होतील असा विश्वास डॉ संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान आमदार अनिल पाटील संपुर्ण कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून फ्रंट लाईन वर काम करीत असून जनतेच्या हितासाठी सतत ते संपर्कात राहिले,प्रशासनासोबत सतत त्यांनी बैठका घेऊन राज्याचे अधिवेशन तथा विकास कामांसाठी मुंबई दौरे देखील त्यांचे सतत सुरू होते,याव्यतिरिक्त काहो दिवसांपूर्वी ग्रामिण रुग्णालयात रुग्णांपर्यंत पोहोचून भेटी देखील त्यांनी घेतल्या होत्या,व त्यानंतर पुन्हा चार पाच दिवसांपूर्वी देखील खाजगी व शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये भेट देऊन रुग्णांना दिलासा त्यांनी दिला होता,सुदैवाने सतत क्रियाशील असतानाही कोरोनाच्या विळख्यापासून ते सहीसलामत होते,मात्र भलेभले यातून सुटत नसताना त्याच पद्धतीने आमदाराना देखील कोरोनाने ग्रासले असून लवकर ते यातून बरे होऊन जनसेवेसाठी सक्रिय व्हावे अशी प्रार्थना हितचिंतक व कार्यकर्त्यानी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!