प्रजाराज्य न्यूज- आजच्या हेडलाईन्स!

शनिवार 3 एप्रिल 2021
▶️ महाराष्ट्र जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट, तर आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात भीषण उद्रेक, युरोप आणि अमेरिकेपेक्षाही महाराष्ट्र डेंजर झोनमध्ये
▶️ आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळले EVM, निवडणूक आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित; नुकतेच आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न तरीही LAC 1 रतबाडी (SC) इंदिर एम.वी स्कूलमध्ये पुन्हा मतदान घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय!
▶️ पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत धरणामध्ये सँट्रो कार कोसळून शुक्रवारी झालेल्या अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, तर एक महिला बेपत्ता; ड्रायव्हरला वाचवण्यात यश!
▶️ अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप आणि बदनामी करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांच्याकडून माजी खासदार किरिट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल
▶️ बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर दिली घरीच विलगीकरणात असल्याची माहिती
▶️ नवीन वेज कोड तूर्तास लागू होणार नाही; कंपन्यांसह नोकरदारांना मोठा दिलासा, कामगार मंत्रालयाची माहिती!
▶️ आजपासून 7 दिवस पुण्यात मिनी लॉकडाऊन; कोरोनाचे संकट कमी व्हावे म्हणून लोकांचा लॉकडाऊनला पाठिंबा महत्वाचा
▶️ खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यास नोकरी बदलल्यास ग्रॅच्युइटीचे नुकसान होणार नाही,पीएफसारखीच करता येणार ट्रान्सफर; ग्रॅच्युइटी पोर्टेबलिटी सुविधा राबवण्याचा सरकारचा विचार
▶️ 75 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग लोक यांचे घरोघरी जाऊन लसीकरण व्हावे; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका.