शनिवार पासून पुन्हा 3 दिवस अमळनेर बंद!

0

अमळनेर(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढल्याने अमळनेर येथे 3,4 व 5 एप्रिल या 3 दिवसांसाठी कडक निर्बंध लादले असून यात प्रांताधिकार्‍यांनी दोन दिवस तर पालीका प्रशासनाने एक दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
शहरात अलीकडच्या काळात शहरासह तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत जास्त वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याची दखल घेऊन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी शनिवार व रविवार असे दोन दिवस तर पालिकेने सोमवारी शहरात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळेनर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या तीन दिवसांमध्ये अमळनेर पालिका हद्दीतील सर्व बाजारपेठ, आठवडे बाजार, किराणा दुकाने, अनावश्यक इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्री केंद्र, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद तसेच हॉटेल, रेस्टॉरंट होम डिलिव्हरी वगळता बंद राहतील. तर सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळ, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहिल. तर दुध विक्री केंद्र, वैद्यकिय उपचार व सेवा, मेडिकल,अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या तीन दिवसांमध्ये प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार संबंधित दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!