अकस्मात मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या वारसांना आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी २ लाखांची मदत!

पारोळा(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे हनुमंतखेडे येथील कै.प्रविण ज्ञानेश्वर पाटील यांचे विहिरीचे खोदकाम करत असतांना दुर्दैवी निधन झाले होते. कै.प्रविण हे कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती. याची दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून कै.प्रविण यांच्या कुटुंंबियांना २ लाख रूपये मंजुर करून आणले.कै.प्रविण पाटील यांच्या वारस,पत्नी मनिषा प्रविण पाटील यांना २ लाख रूपयाचा धनादेश आमदार चिमणराव पाटील यांनी दिला.यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, लिपिक विठ्ठल वारकर, दासभाऊ पाटील, लक्ष्मण पाटील, नामदेव पाटील उपस्थित होते.