नववधूला दोन्ही पतपेढीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान

अमळनेर- फापोरे (ता. अमळनेर) येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माजी सरपंच प्रतापराव पाटील यांची कन्या मोनाली हिचा विवाह प्रगणे डांगरी (ता अमळनेर) येथील अरुणराव शिसोदे यांचे चिरंजीव दर्शन यांच्याशी नुकताच संपन्न झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे “राजमाता जिजाऊ कन्यादान योजना” अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश ग.स.पतपेढीचे संचालक तथा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या हस्ते तर पूज्य साने गुरुजी माध्यमिक पतपेढीतर्फे “सुकन्या योजने”अंतर्गत पाच हजार रुपयाचा धनादेश “टीडीएफ” चे कार्याध्यक्ष उमेश काटे यांच्या हस्ते नववधू मोनाली यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नववधूचे पिता प्रतापराव पाटील, साने गुरुजी पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, संचालक जे एस पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, सावखेडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप महाले, उपक्रमशील प्राथमिक शिक्षक विजय पाटील, ग स पतपेढीचे शाखा अधिकारी किशोर पाटील, बिपीन पाटील आदीसह तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
