भिलाली येथे के टी वेअर, बंधाराचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

बंधारासाठी ४९ लाख निधी मंजूर
पारोळा (प्रतिनिधी) मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत मौजे भिलाली येथे के टी वेअर, बंधारा बांधकामाचे अमळनेर मतदार संघाचे आ. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
भिलाली गावासह, तालुक्यातील अनेक गावांना पाणी साठवण के टी वेअर बंधारा बांधकामासाठी भिलाली येथील सरपंच बेबाताई पाटील, आस्तिक पाटील, सुभाष पाटील, विश्वास पवार, दिलभर कोळी, शामकांत पाटील, अशोक पवार यांच्यासह भिलाली ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे निरंतर पाठपुरावा व मागणी करीत होते. ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यातून पारोळा तालुक्यातील भिलाली गावांसाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
मतदार संघातील अनेक पाणी पुरवठा योजनांना तलाव, व साठवण बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे. परंतु मागील काही वर्षापासून या साठवण बंधारा बांधण्याचा प्रश्न अनुत्तरीत होता. त्याबाबत आ.पाटील यांनी के टी वेअर साठवण बंधारासाठी, दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून मृद व जलसंधारण विभागाने भिलाली गावासाठी पाझर तलाव अथवा, साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
यापैकी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत के टी वेअर बंधारा दुरुस्ती ४७ लक्ष, बोरी नदीवर साठवण बंधारा मृद जलसंधारण अंतर्गत १.२८ लक्ष, २५१५ योजनेंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण ७.०० लक्ष, स्मशानभूमी व सात्वन शेड १५ लक्ष, डीपीटीसी अंतर्गत संरक्षण भिंत (जि.प. शाळा) १३ लक्ष, ब्रिज काम बंधारा १.५० लक्ष, आदी कामांसाठी एकूण ३ कोटी ६० लक्ष रुपये निधी देण्यात आला असून आ.पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
भिलाली गावाकरिता पाणी साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे, अनेक वर्षापासूनचा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा प्रश्न आ.पाटील यांनी मार्गी लावला असून चालू उन्हाळ्यात या साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होवून येणाऱ्या पावसाळ्यात अतिरिक्त पाणी साठले जावून त्याचा मोठा फायदा वरील गावातील नागरिकांना होणार असल्याने सरपंच बेबाताई पाटील यांनी भिलली ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचे आभार मानले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आस्तिक पाटील यांनी केले, अशोक पाटील माजी उपसभापती पारोळा पंचायत समिती ,चंद्रकांत पाटील माजी उपसभापती पंचायत समिती पारोळा प्रमुख उपस्थिती होती या सर्व काम मंजुरीसाठी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रोड विकास प्राधिकरण बापूराव साळुंखे यांचं विशेष सहकार्य लाभलं.शामकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.