अमळनेरचे चौघे “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार”ने सन्मानित

अमळनेरला अतिरिक्त मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव चंद गोयल व जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे उपक्रमशील शिक्षक तथा दै. “सकाळ”चे तालुका पत्रकार उमेश प्रतापराव काटे, कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात काम करणारे माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर यासह अमळनेर महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंग अग्रवाल, संचालक सीए नीराज अग्रवाल, प्रा. डी डी पाटील, प्राचार्य हेमंतकुमार देवरे, उपप्राचार्य व्ही पी अमृतकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सहावे “सृजन- भारत निर्माण” वार्षिक कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यात बाजार समितीच्या माजी मुख्य प्रशासक तिलोतमा पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक प्रदीप अग्रवाल, मुंदडा फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश मुंदडे, माजी उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी, माजी प्राचार्य प्रा डॉ एस आर चौधरी, सिनेट सदस्य दिनेश नाईक, डॉ. अपर्णा मुठे, डॉ अविनाश जोशी, निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख आदींसह यशोदीप सोनवणे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, मिलिंद सोनवणे, व्ही ए पवार, चंद्रकांत पाटील, गायत्री काटे, वैशाली सोनवणे, शितल सोनवणे, प्रा निकिता काटे, वेदांत सोनवणे, वेदिका सोनवणे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदीसह अमळनेर महिला मंचच्या सदस्या, पातोंडा विकास मंचचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. नोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

