डॉ दिनकरराव पाटील यांचे निधन;१८ रोजी अंत्ययात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड (ता अमळनेर) येथील रहिवासी, एक थोर समाजवादी विचारांचे निष्ठावान नेते, आंदोलक तथा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ दिनकरराव रामदास पाटील (भदाणे) (वय- ८४) यांचे आज सकाळी साडे आठला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उदया (ता. १८) सकाळी दहाला मारवड येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते बोरकुंड (ता.जि.धुळे) येथील मूळ रहिवासी आहेत. निवृत्त मुख्याध्यापक भिमराव भदाणे यांचे ते मोठे बंधू , इंजि. विजय भदाणे व संजय भदाणे यांचे वडील तर शिक्षक जगदिश भदाणे यांचे काका होत.
स्व भदाणे यांचे राजकारण सर्व सामान्य गोरगरीब,तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविणेसाठी होते . केवळ निवडून येवून त्या पदाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी ते कधीच निवडणूक लढवत नसत. पं.स. जि.प.निवडणूकीत काँग्रेसच्या विरोधात सत्ताधा-यांना सभांमध्ये समाजवादी
विचारधारेने प्रचार सभांमध्ये निरूत्तर करून सोडत.त्यांनी माजी आमदार
गुलाबरावजी पाटील यांच्या सोबत काम केले.खान्देशात प्रभावी पणे समाजवादाचे विचार गांवागांवात पोहचविले.शेवटच्या श्वासा पर्यंत लाल टोपीची विचारधारा सोडलीच नाही.