अमळनेरला दोन दिवसीय लक्ष्य वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

▶️ अनेक खेळाडूचा सहभाग; “अग्नी” हाऊसने मिळविला ‘प्रथम क्रमांक’
अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये दोन दिवसीय लक्ष्य-२०२२-२३ हा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे अग्नी ,आकाश, पृथ्वी व त्रिशूल अशा चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते. यात “अग्नी” या हाऊसने ‘प्रथम क्रमांक’ पटकाविला.
प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मार्गदर्शक प्रा. डी डी पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे, जितेंद्र ठाकूर, जयवंत ठाकूर, विनोद अमृतकर, संजय पाटील, सुनील वाघ, जास्मिन बरुचा ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या आचल अग्रवाल सितीका अग्रवाल, ममता अग्रवाल, शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे आदी उपस्थित होते.क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन, मानवंदना व मशाल पेटवून अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले. पहिल्या दिवशी सामन्यात पूर्व प्राथमिक , इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
यात हर्डल रेस, झिगझ्याग रेस, सॅक रेस, इटिंग बिस्कीट, नबरिंग गेम्स, कलेक्टिंग ऑब्जेक्ट्स, सोलविंग पझल, कॉलेक्टिंग वॉटर विथ स्पोंज, कॅच द बॉल, टग ऑफ वॉर इत्यादी अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी क्रीडा सामन्यात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यात १००,२००,४०० मिटर धावणे, सॅक रेस, भाला फेक, स्लो सायकलिंग, रीले रेस अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. “अग्नी” या हाऊसने ‘प्रथम क्रमांक’ पटकाविला. यामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्ण ,कास्य व रौप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी उमेश काटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनीही मार्गदर्शन केले. क्रीडाशिक्षक सुनील करंदीकर ममता पाटील , कु .हर्षदा सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. निशा पाटील, राजश्री देसले, नयना पाटील व महेश जेठवा यांनी सूत्रसंचालन केले.