मा.आमदार स्मिताताई वाघ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड!

मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिताताई उदय वाघ यांचा पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाहीसाठी होण्यासाठी त्यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,त्याचे नियुक्तीपत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पाटील यांनी दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी अभिनंदन केले आहे.