टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे गरीब मुलांना दिवाळी भेट

पारोळा (प्रतिनिधी) येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आणि त्यासोबत संस्कार आणि संस्कृती तर शिकवतेच त्यासोबतच महत्त्वाचं आहे सामाजिक कर्तव्यांची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्कूलचे अध्यक्ष श्री रवींद्र पाटील आणि संचालिका सौ रुपाली रविंद्र पाटील हे वेळोवेळी आपल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी अशी शिकवण दिली होती त्याचाच फलस्वरूप म्हणून स्कूलच्या ज्युनिअर केजी ऑरेंज च्या विद्यार्थ्यांनी निर्णय केला की,ह्या दिवाळीत गरीब विद्यार्थ्यांना स्नेह भेट देऊ, त्याकरिता शिक्षिका दुर्गा क्षत्रिय आणि स्कूलच्या सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले. स्कूलच्या प्राचार्यांच्या हस्ते गरीब मुलांना स्नेह भेट वाटप करण्यात आली.