अमळनेर तालुक्यात 22 पासून “करियर संवाद वारी- थेट आपल्या दारी”

▶️ शनिवारी उद्घाटन, उच्चपदस्थ अधिकारी करणार युवकांना मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व सर्व विकास मंचतर्फे करियर संवाद वारी- थेट आपल्या दारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शनिवार (ता.२२) पासून ते मंगळवार (ता.२५) पर्यंत करण्यात आले आहे. यात प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन हे विद्यार्थी व तरुणांना मिळणार आहे. ऐन दिवाळीत तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शनाची मेजवानी मिळणार आहे.
तरुणांना करिअर विषयक मार्गदर्शन, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, वर्ग ३ ची पदे यात तालुक्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी तालुक्याचे सुपुत्र असलेल्या अधिकारी वर्गाच्या वतीने ग्रामीण भागात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागपूरचे आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे, नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार, गोंदिया च्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे- पवार, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, उपअभियंता विजय भदाने, युनियन बँक मॅनेजर मयूर पाटील, स.पो. नि. लिलाधर पाटील, ए. पी.आय. गोपीचंद नेरकर, आर टी ओ स्वप्नील वानखेडे, डीएसओ विनोद धनगर, पीएसआय चांदणी पाटील, एसटीआय संदीप पाटील, पीएसआय भूषण पाटील, पीएसआय शरद सैदाणे, कर सहायक हर्षा साळुंखे, पीएसआय संदीप भोई, कर सहायक पूजा वानखेडे, लेखापरीक्षक प्रशांत पाटील, जळगाव पोलीस सुनील साळुंखे, चंदन पाटील, गणेश भदाने यांच्यासह नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील, डॉ. एस आर चौधरी, डॉ. एस ओ माळी, प्रा डॉ. विजय तूंटे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
▶️ या गावात जाणार करियर संवाद वारी
शनिवारी (ता.२२) जवखेडा येथे सकाळी ८.३० ते १०.३०, मांडळ येथे सकाळी ११ ते दुपारी १, जानवे दुपारी ३ ते ५, शिरूड येथे सायं. ६ ते ९ रविवारी (ता.२३) येथे कन्हेरे येथे सकाळी ८.३०.ते १०.३०, दहिवद येथे सकाळी ११ ते दुपारी १, पातोंडा येथे दुपारी २ ते ५, खेडी प्रज येथे सायं. ६ ते ९, सोमवारी (ता२४) भरवस येथे सकाळी ८ ते.१०.३०, सानेनगर येथे सकाळी ११ ते १, करणखेडे येथे दुपारी २ ते ५, मंगळवारी (ता.२५) मारवड येथे सकाळी ८.३० ते १०.३० असे या कार्यक्रमाचे नियोजन असून मारवड येथे कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या करियर संवाद यात्रेत विद्यार्थ्यांनी हजेरी लावत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व तालुक्यातील विविध विकास मंचांतर्फे करण्यात आले आहे.