तांदळीतील केटीवेअर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार-आ.अनिल पाटील

0

▶️ तांदळीत 53 लक्षच्या विकासकामांचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तांदळी येथे पांझरा नदीवरील वाहून गेलेल्या धुळे जिल्हा हद्दीतील केटीवेअर च्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमातून हा बंधारा करण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार अनिल भाईदास पाटील यांनी तांदळी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दिली.
तांदळी येथे विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त आमदारांचे आगमन झाले होते यावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढुन त्यांचे स्वागत आणि सत्कार केला,यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदारांनी 2019 साली अतिवृष्टीमुळे पांझरा नदीवरील केटीवेअर वाहून गेल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,प्रत्यक्षात हा बंधारा धुळे जिल्हा हद्दीत असला तरी येथील शेतकरी बांधवांसाठी तो जिव्हाळ्याचा विषय असल्याने यासाठी जोमाने पाठपुरावा करणार अशी ग्वाही आमदारांनी दिली तसेच अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवाना मदत मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदारांनी सांगत गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
या वेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील,स्वप्निल सुरेश परदेशी (सरपंच), सुनील इंदल परदेशी (सदस्य), मगन राजधर कोळी, गुलाब भटू पाटील, रमेश भालचंद परदेशी, रतिलाल पुंडलिक पाटील, सुनील दादासाहेब पाटील, ललित रतन पाटील, राकेश दगाजी पाटील, दगा देवराम सोनवणे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▶️ या विकासकामांचा झाला शुभारंभ
आमदार निधीतुन सभामंडप बांधणे रक्कम 15 लक्ष ,जि.प.स्तर- सिंचन विभाग (पतराड नाला/ बंधारा बांधणे) रक्कम 10 लक्ष ,जि.प.स्तर जलयुक्त शिवार अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती करणे रक्कम 21 लक्ष ,जि.प.स्तर दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत काँक्रिटीकरण करणे रक्कम 3 लक्ष,जि.प.स्तर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत पाणी खडी व पाईपलाईन करणे,रक्कम 4 लक्ष असे
एकूण 53 लक्षच्या कामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!