शितल अकॅडमीने केला प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांचा सन्मान!

पारोळा (प्रतिनिधी) शीतल अकॅडमी येथे प्रशासकीय अधिकारी श्रीमती कविता भीमराव सुर्वे गटशिक्षणाधिकारी पारोळा आणि नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कविता भीमराव सुर्वे या उपस्थित होत्या,यावेळी अकॅडमीचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील सर आणि टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका श्रीमती रूपाली रवींद्र पाटील तसेच श्रीमती वर्षा पाटील केंद्रप्रमुख, नगरसेवक पी जी पाटील, डॉ.विलय शहा तसेच भाजपा शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी, श्रीमती अन्नपूर्णा पाटील सामाजिक कार्यकर्ता तसेच अजीम शेख प्रिन्सिपल टायगर इंटरनॅशनल स्कूल हे उपस्थित होते.
सरस्वती पूजनाप्रसंगी एका छोट्याशा रोपट्याला पाणी टाकून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि निसर्गाची काळजी हे आपलं कर्तव्य आहे सर्वांना करून देण्यात आली. सर्वप्रथम तर कार्यक्रमात श्रीमती कविता भीमराव सुर्वे शासनाचे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी सन 2022 23 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शितल अकॅडमी तर्फे सत्कार आणि अभिनंदन करण्यात आला,तसेच त्यांच्या हस्ते पारोळ्यातील NEET परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल क्षितिज विलाय शहा याला 720 पैकी 675 मार्क्स मिळाले आणि संपूर्ण भारतातील रँक 1139 तसेच सुधीर सुनील पवार याला 720 पैकी 590 मार्क्स आणि मीतेश मुकुंदा चौधरी याला 720 पैकी 587 मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आला, तसेच शितल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं विविध स्पर्धांच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणही करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना नगरसेवक पी जी पाटील यांनी शीतल अकॅडमीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अभिनंदन आणि कौतुक केला तसेच विद्यार्थ्यांना आज व्यावसायिक आणि प्रासंगिक शिक्षण मिळणे हे आवश्यक आहे असं प्रतिपादन केलं.
यावेळी कविता सुर्वे यांनीही विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन केलं आणि आपले खरे नायक असे विद्यार्थी आहेत जे संघर्ष आणि जिद्द चिकाटीने यश संपादन करतात तसेच आजच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कृती आणि संस्कार शिकवणी ही खूप महत्त्वाची आहे तसेच एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व घडावे याकरिताही शासनाकडून ही विविध उपक्रम आज राबवले जातात याबाबतीतही त्यांनी सर्वांचे मार्गदर्शन केले तसेच शितल अकॅडमीच्या कमवा आणि शिका या योजनेचे ही त्यांनी अभिनंदन केलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका हर्षदा परदेशी यांनी केलं तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल अकॅडमीच्या शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
