स्व.बापूसाहेब प्रतापराव काटे यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा

रक्तदान व सिमेंट पाणी टाकीचे केले लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीचे संचालक, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक तथा आदर्श शिक्षक स्व.बापूसाहेब प्रतापराव राजाराम काटे यांचा द्वितीय स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करून अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
सकाळी स्व. बापूसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी 5 हजार किंमतीची पाण्याची सिमेंट टाकी देण्यात आली. त्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या कार्यवाहक दर्शना पवार, डॉ.दिनेश पाटील, डॉ.अतुल चौधरी, आर.पी.पवार, यशोदीप सोनवणे, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, सचिव उमेश काटे, वैशाली सोनवणे, गायत्री काटे, निकिता काटे, जागृती काटे, वेदांत सोनवणे, शाहूराजे काटे, दक्षता काटे उपस्थित होते. यावेळी काटे कुटुंबियांना साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीतर्फे प्रतिमा देऊन ऋणनिर्देश करण्यात आले.यानंतर वडीलांची कृतज्ञता म्हणून सामाजिक सेवा म्हणून जीवनश्री रक्तपेढीत जयेशकुमार काटे व उमेश काटे यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तपेढीचे संचालक संतोष हरी पाटील उपस्थित होते. आपल्या मातापित्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येकाने अशा पद्धतीने रक्तदान केल्यास एक वेगळी समाजोपयोगी प्रथा निर्माण करणे काळाची गरज असल्याचे काटे कुटुंबियांनी कृतीतून दाखवून दिले आहे.


