खेडी प्र.ज. येथे राजमुद्रा अभ्यासिका तर्फे प्रेरणादायी व्याख्यान

दहावी,बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही केला सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) प्रजाराज्य न्यूज
खेडी प्र.ज. (ता.अमळनेर) येथील राजमुद्रा अभ्यासिका यांच्यातर्फे गावातील दहावी व बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. संकल्पक युवा उद्योजक
महेश मनोहर शिंदे यांचा दातृत्वातून हा कार्यक्रम घेण्यात आला. पूज्य सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंग पवार यांचे “दहावी बारावी नंतर काय?” या विषयावर तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांचे “शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांचेही धडे देणे काळाची गरज” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. खेडीच्या सरपंच आशाबाई ज्ञानदेव पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जेष्ठ नागरिक इंदूताई दयाराम शिंदे, उपसरपंच शोभाबाई पाटील यांच्यासह निवृत्त शिक्षक भाऊराव पवार, तान्हाजी पाटील, आदर्श शेतकरी विलास शिंदे, रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.श्याम पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रा. डी डी पाटील, मनीषा पाटील, मंगलबाई पाटील, माजी पोलीस पाटील भानुदास पाटील, अमळगांव विकास संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर शिंदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र पवार, पोलीस पाटील निलेश पाटील, एम एस पाटील, वाय डी शिंदे, किरण पाटील, सरवर पिंजारी, संजय पाटिल, किसन पाटिल, विजय पाटिल, भाऊराव पाटील, शांताराम शिंदे राजेंद्र पाटील, अनिल पाटील, दिपक पाटील, भास्कर पाटील, आशा स्वयंसेविका कल्पना पाटील व बचत गटच्या प्रतिनिधी सुनीता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयसिंग पवार यांनी सांगितले की, विद्यार्थी जर मोबाइल पासून दूर राहिले तर विद्यार्थी आयुष्यात यशस्वी उंची गाठू शकतात. मुलींनी सुद्धा स्पर्धा परिक्षा क्षेत्राकडे वळावे असे आवाहन करीत अभ्यासिकेचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनी रुजवले. उमेश काटे यांनी सांगितले की, आजच्या काळातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच नैतिक संस्काराचे धडे देणे काळाची गरज आहे. सुशिक्षित लोकांमध्येच या संस्कारांची कमतरता दिसून येते याउलट कमी शिकलेल्या व अल्पशिक्षित असलेल्या लोकांमध्ये संस्कारांची मूल्य अधिक दृढ झालेले दिसतात. प्रा.कैलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जिजाबराव पाटील यांनी आभार मानले. राजमुद्रा अभ्यासिकेचे सदस्य समाधान पाटील, विशाल वारूळे, भावेश पाटील, मयुर पाटील, सारंग पाटील, नरेंद्र पाटील, स्वामी पाटील, तुषार पाटील, किरण पाटील व इतर सदस्य यांनी सहकार्य केले.
