विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवावा!-डी बी पाटील

▶️ अमळनेरला आर्मी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रशासनाच्या सर्वोच्च पदावर जावे व शाळेचा नावलौकिक वाढवावा असे मत नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील यांनी व्यक्त केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये झालेल्या दहावी बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य पी.एम. कोळी हे अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे मानद संचालक प्रा.सुनील गरुड , कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, दत्तात्रय सैंदाणे, विजय पाटील, देवेंद्र जाधव, रामलाल बारेला, मीराबाई पाटील, द्वारकाबाई कदम, अभिषेक सूर्यवंशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बारावीतील प्रथम नीरज कोळी, द्वितीय भावेश सोनवणे, तृतीय वैभव सोनवणे, एसटी सवर्गातून प्रथम आलेला आर्यन पवार, द्वितीय पिंटू बारेला, तृतीय स्वामी जांभोरे, दहावीत प्रथम अमोल जोगी, द्वितीय तुषार राठोड व कुणाल मोरे, तृतीय ललित कुमार पाटील, एसटी सवर्गात प्रथम ऋषिकेश अखडमल, द्वितीय रवींद्र पवार, तृतीय दीपक चौरे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पालकांसोबत सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रा. सुनील गरुड यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक व शिक्षकांनी कोणते प्रयत्न करावेत यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पालक सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक पालक समितीचेही निवड करण्यात आली. दरम्यान यावेळी आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंचलन द्वारा पालकांना व मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी विविध लष्करी प्रशिक्षणाच्या कसरती विद्यार्थ्यांनी करून दाखवल्या.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले तर गोपाल हडपे यांनी आभार मानले. यावेळी पालक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.