अमळनेर गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) “व्ही स्कूल उपक्रमात” अमळनेर तालुक्यातील टीमद्वारे गुणवत्तापुर्ण व्ही स्कूल साहित्य निर्मिती १०० पुर्ण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील उपस्थित होते. दरम्यान व्ही स्कूल साहित्य निर्मितीत तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना वाडीले, संबंधित विषय शिक्षक यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या सन्मानाबद्दल शिवशाही फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.