अमळनेर मतदारसंघात अवतरणार सिंचन बंधाऱ्यांची मालिका

0

▶️ एकाचवेळी तब्बल 23 साठवण बंधाऱ्यांना मिळाली प्रशासकीय मान्यता,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाचे फलित
अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघातील ग्रामिण जनतेचा शहराशी संपर्क वाढण्यासाठी रस्ते आणि शेतीच्या भरभराटीसाठी सिंचन प्रकल्प याकडे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असतांना त्याच अनुषंगाने मतदारसंघात एकाचवेळी तब्बल 23 सिंचन बंधाऱ्यांची मालिकाच त्यांनी मंजूर करून आणली असून यामुळे येणाऱ्या काळात बंधाऱ्यांचा संपूर्ण परिसर जलमय होणार आहे.
सदर 23 प्रकल्पांसाठी सुमारे 15 कोटी 72 लक्ष,78 हजार 982 निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हे सिंचन प्रकल्प उभारले जाणार आहे, यात अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यात 18 बंधारे असून अमळनेर तालुक्यातील 5 बंधारे आहेत, यात प्रामुख्याने बोरी नदीवरील कोळपिंप्री येथे दोन बंधारे तसेच शेवगे बु., महाळपुर, बहादरवाडी व अमळनेर येथील मोठ्या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यास आगामी काळात अनेक गावांना शेती सिंचनासाठी फायदा होऊन हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, तसेच परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील याचा फायदा होणार आहे.
▶️ पारोळा तालुक्यातील बंधारे
कोळपिंप्री बंधारा 1 रक्कम 13663762, कोळपिंप्री बंधारा 2 रक्कम 7505258, शेवगे बु बंधारा रक्कम 17584852, हिवरखेडा तांडा बंधारा रक्कम 4128443, अंबापिंप्री बंधारा 6 रक्कम 4914399, अंबापिंप्री बंधारा 7 रक्कम 5816616, अंबापिंप्री बंधारा 8 रक्कम 5936847, शेळावे बंधारा 3 रक्कम 5517773, महाळपूर बंधारा 1 रक्कम 3560787, महाळपुर बंधारा 2 रक्कम 3581351, महाळपुर बंधारा 3 रक्कम 4224190, महाळपुर बंधारा 4 रक्कम 13393249, रत्नापिंप्री बंधारा 1 रक्कम 3891912, चिखलोड बु बंधारा रक्कम 4346638, शेवगे बु बंधारा 1 रक्कम 2088129, शेवगे बु बंधारा 2 रक्कम 3090784, शेवगे बु बंधारा 3 रक्कम 2125812, शेवगे बु बंधारा 4 रक्कम 3820627.
▶️ अमळनेर तालुक्यातील बंधारे
बहादरवाडी बंधारा रक्कम 13380077, अमळनेर बंधारा रक्कम 13542202, फाफोरे बंधारा रक्कम 2781544, शिरूड बंधारा 1 रक्कम 4983183, हिंगोणे बंधारा रक्कम 13400547.
एकंदरीत अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील गावासाठी एकूण रक्कम- 10,91,91,429 असून अमळनेर तालुक्यातील गावासाठी एकूण रक्कम 4,80,87,553 इतकी आहे असे एकूण अमळनेर मतदारसंघासाठी एकूण 15,72,78,982 रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर मंजुरी बद्दल आ.अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.तर आमदारांनी ही बंधाऱ्याची मालिकाच मंजूर करून आणल्याने बळीराजा सुखावला असून सर्वत्र आमदारांचे विशेष कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!