राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)-येथील पत्रकार भवनात झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक १२ रोजी संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.डी.पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे,प्रा.शरदराव वानखेडे,सुभाष घाटे,भटू नेरकर,सुलोचनाताई वाघ, श्रीधर चौधरी, अण्णाभाऊ पाटील मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संतोष बाबुराव पाटील( बाहदरवाडी) यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे साहेब जिल्हाध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सुलोचनाताई वाघ ,भटूभाऊ नेरकर,राजेशजी काकडे,सुभाष घाटे ( राष्ट्रीय युवा अध्यक्ष) प्रा.शरदराव वानखेडे सहसचिव यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष सुभाषराव घाटे,शरदराव वानखेडे,राजेश काकडे,भटूभाऊ नेरकर,कैलास प्रभाकर चौधरी, नितीन चौधरी, राजेंद्र
चौधरी, श्रीधर चौधरी, अण्णाभाऊ पाटील, राजेंद्र सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रदेश/विभाग/जिल्हा/तालुकास्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.