महिला मंडळ तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिवस संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळ तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिवस संपन्न झाला.सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या प्रीतल बिरारी यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले कार्येक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाच्या उपाध्यक्षा समाजसेविका ज्योत्स्ना जाधव यांनी केले.यावेळी पार्वतीबाई चौधरी,सानिका महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्या विषयी मनोगत वक्त केले तसेच मिनाबाई महाजन,पार्वतीबाई चौधरी,ज्योत्स्ना जाधव,कविता महाजन,ललिता माळी, ज्योती महाजन तसेच क्षत्रिय फुलमाळी समाजाचे पदाधिकारी विश्वस्त मंडळ उपस्थित होते.