संभाजीराव पाटील यांचे निधन;मंगळवारी अंत्ययात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू सिम रोडवरील माधव नगर मधील रहिवासी तथा निवृत्त शिक्षक संभाजीराव पंडितराव पाटील (वय- ८०) यांचे 28 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे दोनला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 1मार्च मंगळवारी रोजी सकाळी साडे नऊला येथील माधव नगर मधील राहत्या घरापासून निघणार आहे. ते ढेकू खु (ता अमळनेर) येथील मूळ रहिवासी होते. ते प्राथमिक शिक्षक रत्नाकर पाटील यांचे वडील, खान्देश साहित्य संघाचे तालुकाध्यक्षा सुनिता पाटील व गोकुळ पाटील यांचे सासरे होत.