ना.नवाब मलिक यांच्या अटकेचा अमळनेरात राष्ट्रवादीतर्फे निषेध

0

चुकीच्या पद्धतीने अटक झाल्याचा आरोप,प्रांताधिकारीना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर करीत ईडीला हाताशी धरुन 20 वर्षांपूर्वीची खुसपट काढीत कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप अमळनेर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करत तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गोळा होवून गुरुवारी निदर्शने करीत निवेदन सादर केले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. सुरेश तात्या पाटील, जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील,कृऊबा प्रशासक तिलोत्तमाताई पाटील, शिवाजी दासभाऊ,अलका पवार, आशाताई चावरिया, योजना पवार, गौरव उदय पाटील, यतीन पवार, सुनिल शिंपी, राहुल गोत्राळ, देविदास देसले, गोविंदा बाविस्कर, एल.टी.पाटील, संजय पुनाजी पाटील, निनाद शिसोदे, भूषण भदाणे,
प्रा. मंदाकिनी भामरे,लतीफखॉं पठाण, मुनिर शेख, सनी गायकवाड, वसिम खॉं, भारती शिंदे, के.आर. शेख, अंकिता पाटील, वैशाली ससाणे, रणजित पाटील, अबिदअली मोहम्मदअली,विनोद कदम आदि उपस्थित होते.
निषेधाच्या घोषणांनी पूर्ण आवार दणाणून गेले होते. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्विकारले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!