मराठा सेवा संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी रामेश्वर भदाणे तर सचिवपदी प्रेमराज पवार

अमळनेर(प्रतिनिधी) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मराठा सेवा संघाच्या मासिक बैठकीत तालुका कार्यकारणी पुनर्गठित करण्याच्या दृष्टीने चार प्रमुख पदांची निवड घोषित करण्यात आली. यात मराठा सेवा संघाच्या अंमळनेर तालुकाध्यक्षपदी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांची सचिवपदी प्रेमराज पवार, कार्याध्यक्षपदी अशोक साळुंखे तर उपाध्यक्षपदी बापुराव ठाकरे यांची निवड घोषित करण्यात आली. प्रा. लिलाधर पाटील व प्रा. डॉ. विलास पाटील यांनी ही निवड बैठकीत जाहीर केली याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत चिखलोदकर व शिवश्री कैलास पाटील यांनी ही धुरा नवीन कार्यकारणी कडे सुपूर्द केली.
‘मराठा सेवा संघ ही राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे एक प्रभावी सामाजिक संघटना असून या विचारधारेशी प्रामाणिक राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करेल’ असे मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी व्यक्त केले. यावेळी 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे नियोजन देखील करण्यात आले. पुढील महिन्यात होणाऱ्या मासिक बैठकीत उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे तालुका सचिव प्रेमराज पवार यांनी सांगितले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

