अंमळनेर मनसे तालुकाध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व राज्य उपाध्यक्ष विनोद भोईटे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदाभाऊ रोटे यांच्या हस्ते जळगाव जिल्हा अमळनेर तालुका अध्यक्षपदी संदीप बापूराव पाटील(काटे) यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे ध्येय धोरणे यांच्या प्रचार-प्रसार व पक्ष संघटन बळकटीकरणाची जबाबदारी देण्यात आली.