शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; मनसेचे तहसीलदार यांना निवेदन

0

अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २ लाखाच्या वरील कर्जधारक व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावे यासाठी अमळनेर तहसीलदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन दिले.महाराष्ट्र सरकार द्वारे सन २०१९ -२०मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जाहीर घोषणा करण्यात आली होती. या योजनेत समस्त कर्जबाजारी शेतकरी यांना लाभ मिळणार असल्याच्या मोठं मोठ्या घोषणा या सरकारद्वारे करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या नावाने घोषित केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा रु.२ लाखच्या आतील कर्जधारक शेतकरी यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. तसा शासनाने शासन परिपत्र देखील काढला होता. मात्र त्या सोबत २ लाखापेक्षा जास्तीचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील २ लाखापर्यंत या योजनेचा लाभ होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी २लाखावरील पैसे बँकेत जमा करण्याचे देखील घोषित करण्यात आले होते. व जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना देखील सरकार ५० हजार मानधन देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते. मात्र सरकारने फक्त घोषणाबाजी केल्याने समस्त महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीची आशा लावून बसला व त्या आशेअभावी शेतकऱ्यांचे २वर्षाचा व्याजाचा बोझा शेतकऱ्याचे डोक्यावर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त व वैफल्यग्रस्त झालेला आहे. त्यात बँकांनी तगादा लावणे सुरू केले आहे, सरकारच्या या अमिष्याला बळी पडल्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ रेग्युलर कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार मानधन द्यावे व २लाखावरील कर्जबाजारी शेतकऱ्यांना देखील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा.असे निवेदन अमळनेर मनसे तर्फे देण्यात आले,यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंके मनसे सैनिक प्रवीण पाटील भुषण पाटील व तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!