ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी दिगंबर पाटील यांची नियुक्ती

पारोळा (प्रतिनिधी) ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय नोंदणीकृत ग्राहक संघटनेची बैठक नुकतीच आयडीयल इंग्लीश मीडियम स्कूल पारोळा येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत शेवगे बूll ता. पारोळा येथील आदर्श शेतकरी दिगंबर वना पाटील यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरीय ग्राहक संघटनेच्या पारोळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या वतीने ,
ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (पारोळा) यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.
बैठकीला ,डॉ.शांताराम दाजिबा पाटील, सिस्काम कंप्यूटर चे संचालक बापू पुंजू महाजन, शिवसेना माजी शहर प्रमुख रमेश लोटन मिस्तरी (बापू मिस्तरी) ,डॉ.कैलास नीलकंठ पाटील, सूनील प्रताप काटे , मेहमूदखा भिलेखा पठाण , दिलीप कपूरचंद पाटील , चंद्रकांत जावरे , गणेश रघूनाथ बिचवे,निलेश रोहिदास पाटील , मनोहर संतोष पाटील ,नाना सुकदेव पाटील आदी उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
कार्याध्यक्ष – डॉ.शांताराम दाजिबा पाटील (पारोळा), उपाध्यक्ष-नाना सुकदेव पाटील (टिटवी), सह कार्याध्यक्ष- डॉ.कैलास निळकंठ पाटील (लोणीसीम) ,सचिव – निलेश रोहिदास पाटील (मुंदाणे प्र .अ. ) सह सचिव -मेहमूदखा भिलेखा पठाण (उंदिरखेडे), कोषाध्यक्ष – रमेश लोटन (बापू) मिस्तरी (पारोळा), सह कोषाध्यक्ष- सुनिल प्रताप काटे (कोळपिंप्री) , सदस्य – चंद्रकांत किसनलाल जावरे (बहादरपुर) , मनोहर संतोष पाटील (शिरसमनी) ,गणेश रघुनाथ बिचवे (पारोळा ),दिलीप कपूरचंद पाटील (मंगरूळ)दिगंबर पाटील
यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतिश पाटील , आ. चिमणराव पाटील ,अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील ,माजी खा. ए.टी.पाटील ,माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, नगराध्यक्ष करण पाटील, कृ.ऊ.बा.सभापती अमोल पाटील, जि.प सदस्य रोहन पाटील ,नगरसेवक रोहन पाटील , यांच्यासह ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर,उपाध्यक्ष रामचंद्र तांबे , प्रदेश कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन,समन्वय समिती अध्यक्ष सतिश जयवंत साकोरे,सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम सोपानराव झेंडे , राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळि,प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले महाराष्ट्र भरातील ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते ,पदाधिकारी आदींनी अभिनंदन केलेले आहे.