उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेला लोकनेता; स्व.उदयबापू वाघ

0

स्व.उदयबापू वाघांचा आज द्वितीय स्मृतीदिन, स्मारकस्थळी जमणार मोठा जनसमुदाय

संघटनेतील लढवय्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय उदय भिकन वाघ. जळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक आमदार व खासदार निवडून देण्यामध्ये ज्या पक्ष जिल्हाध्यक्षाने काम केले, त्यात स्वर्गीय उदय वाघ यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. जिल्हा दूध संघात तीस रुपयाने रोजंदारी ने काम करणारा कामगार तर कधी रिक्षा ड्रायव्हर तर कधी छोटासा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय केला. पत्रकारितेतही आपल्या कार्याची चुणूक त्यांनी दाखवली होती. राजकीय कारकिर्दीत सरपंचपदापासून सुरुवात करणारा यशस्वी भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो, ही बाब अमळनेरकरांसाठी अभिमानास्पद होती.
उदय बापूना १९९० ला युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पासून थेट युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर गोवा भाजपचे युवा प्रभारी म्हणूनहु मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. पक्षांतर्गत जिल्हा चिटणीस सरचिटणीस तसेच सलग दोन वेळा जिल्हाध्यक्षपदाचा त्यांनी त्यांचा कार्यकाळ होता. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद विविध ग्रामपंचायती, बाजार समित्या, जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुका झाल्या. विशेष म्हणजे या सर्वच निवडणुकीत पक्षाला दणदणीत यश मिळाले यात उदय बापूंचे यशस्वी नेतृत्व संघटन कौशल्य आणि रचनात्मक कार्याचे ते फलित होते एवढे मात्र निश्चित ! २५ वर्षाच्या संघटन कार्यात सर्वाधिक यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद झालेली आहे. सहकार क्षेत्रातही उदय बापूंनी आपले वर्चस्व दाखवून दिले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पद शेतकी संघ संचालक बाजार समितीचे सभापती पद जिल्हा दूध संघाचे संचालक पद तसेच श्री गणेश पतसंस्थेचे संस्थापक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली त्यानंतर शेतकरी सह बागायतदार संघाची स्थापना ही केली.

▶️ उदयबापू -स्मिताताई ची यशस्वी जोडी

उदय बापूंच्या अंगभूत असलेल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी आपल्या सोबत कार्यकर्त्यांचे एक मोहोळ निर्माण केले होते विद्यार्थीदशेपासूनच त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती पुढील काळात उदय बापूंना सहजणी सहचारिणी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या संघटन कार्यात साथ मिळाली ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव व वेणूताई या दाम्पत्याचे नाव घेतले जाते त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात एक यशस्वी जोडी म्हणून उदय बापू व स्मिता ताई यांचे नाव अग्रस्थानी दिसून येते याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वच जिल्हावासीयांना आलेला आहे. स्मिताताईंनी ही उदय बापूंच्या खांद्याला खांदा लावून राजकीय क्षेत्रात काम केले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आल्या त्यानंतर त्यांची थेट वरिष्ठ सभागृह अर्थात विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. ज्या पद्धतीने यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्याच पद्धतीने एका यशस्वी यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा कसा पाठिंबा असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.उदय बापूंचे वडील स्वर्गीय भिकन तात्या यांचीही ओळख गाव परिसरात होती, त्यांच्याच ओळखीमुळे स्मिताताई प्रथमतः जानवे डांगर जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या. त्यानंतर स्मिता ताईंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळाले होते. स्मिताताई म्हणजे डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायाला भवरी असलेले एक व्यक्तिमत्व आहे. सद्यस्थितीत स्मिताताई व भैरवीताई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन सुरू आहे.

▶️ डांगर गावाचे “उदय नगर” नामकरण

उदय बापूंना समाजसेवेचे बाळकडू तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यातून मिळाले होते. त्याचा फायदा त्यांना सरपंच पदाच्या कारकिर्दीतील कारकिर्दीत मिळाला सामाजिक कार्याच्या आवडीमुळे त्यांनी ग्राम सुधारणेचा विडा उचलला अन तो पूर्णही केला. आत्मविश्वासाने त्यांनी गावाचा कायापालट केला, गावातील संपूर्ण रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले. गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते, यासाठी पाणी पुरवठ्यासाठी स्वतःची जमीन देऊन पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिली. गावातील धनदाई देवी माता देवस्थान ट्रस्ट निर्माण केले. भवानी माता देवस्थान ट्रस्टची स्थापना केली. शासकीय योजनेतून गावाला संरक्षण भिंत उभारली. तसेच गावात सुशोभीकरण केले. गावकऱ्यांनी डांगर या गावाचे उदय नगर असे नामकरणही केले आहे.

▶️ चला स्मारकस्थळी जाऊया… स्व.उदय बापूंना आदरांजली वाहूया,,,

स्व.उदय बापू वाघ म्हणजे राजकीय क्षेत्रातील वादळच,ज्यांनी अमळनेर परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच आपल्या अस्तित्वाची झलक दाखवली,दुर्देवाने हे वादळ दोन वर्षांपूर्वीच क्षमल असलं तरी या वादळाच्या अफाट कार्याचा गारवा आजही जाणवत असून आज उदयबापूंच्या द्वितीय स्मृतिदिनी तालुका व जिल्हा भरातील हजारो हितचिंतक व कार्यकर्ते अमळनेर येथील स्मारक स्थळी निषब्ध राहून पुष्पांजली अर्पण करणार आहेत.
दोन वर्षांपासून बापू हयात नसले तरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील स्व.उदय बापूंचे स्मारक क्षणोक्षणी ते या भूमीत हयात असल्याचाच आभास निर्माण करीत आहे. शहरातील कार्यकर्ता असो कि ग्रामिण भागाचा त्यास बापूंची आठवण आली म्हणजे त्याचे पाय आपसूकच स्मारक स्थळी वळत असतात,एवढेच काय काही जण तासनतास बसून बापूंचा प्रत्यक्ष सहवास प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येक जवळचा कार्यकर्ता ज्यावेळी स्मारकस्थळी येऊन आपला वाढदिवस साजरा करतो त्यावेळी बापू आणि कार्यकर्ता यांचं नात किती घट्ट याचा प्रत्यय अनेकांना येतो,कोणत्याही निमित्ताने का असेना वर्षभर याठिकाणी काहिनाकाही उपक्रम सुरूच असतात,त्यामुळे बापूंचा हा स्मारक परिसर म्हणजे जणू काही त्यांचा दरबारच झाला असून बापूंच्या आज द्वितीय स्मृती दिनी त्यांचे सारेच कार्यकर्ते या दरबारात दिवसभर थांबून आठवणींना उजाळा देणार आहेत.तरी तालुका व जिल्हाभरातील ज्या कुणाला स्व.बापूसाहेबाना श्रद्धांजली अर्पण करायची असेल त्यांनी या स्मारक येऊन पुष्पहारानी आदरांजली अर्पण करावी असे भावनिक आवाहन तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि प्रेमी मंडळींनी केले आहे.
स्व. उदय बापूंच्या या स्मारकस्थळी माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ,त्यांची कन्या भैरवी वाघ-पलांडे व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय देखील उपस्थित असणार आहेत.स्व बापूंच्या पश्चात स्मिताताई वाघ यांनी मोठ्या दुःखातून स्वतःला सावरत आपले कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांना पोरके होऊ न देता पालकत्व स्वीकारले असून त्यामुळेच तालुका परिसरात भाजपाचा गड देखील जैसेथे स्थितीत राहिला आहे,स्मिताताईंचे हात बळकट करण्यासाठी त्यांची कन्या भैरवी वाघ यांनीही कमळ हाती घेतल्याने तिच्यात उदय बापूंचीच छबी कुठेतरी दिसू लागली असून यामुळे कार्यकर्तेही पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. बापूंसाहेबाना आजच्या स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!