अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी डॉ.बी.बी. भोसले यांची निवड!

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठा महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मध्यवर्ती कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सदर बैठकीत जळगाव येथील नूतन जिल्हा अध्यक्ष पदी भडगाव येथील डॉ.बी.बी.भोसले यांची निवड करण्यात आलेली असून, यावेळी राज्यातील सर्व पदाधिकारी तसेच सदर बैठकीस माजी आमदार भाई जगताप हे देखील बैठकीस उपस्थित होते.त्यांची निवड अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अड. शशिकांत पवार तसेच राष्ट्रीय सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी घोषित केलेली आहे.
तसेच जळगाव जिल्हा मराठा महासंघाची नवीन कार्यकारणी हि डॉ.बी.बी.भोसले यांच्या अध्यक्षते खाली लवकरच घोषित करण्यात येणार आहे. सदर निवडीबाबत त्यांचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शशिकांत पवार तसेच राष्ट्रीय सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी अभिनंदन केले.