राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर!

0

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

मंगळवार, दिनांक 16 नोव्हेंबर, 2021 सकाळी 7.00 वाजता अकोला येथून खाजगी मोटारीने बोदवड, जिल्हा जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता बोदवड-जामनेर-पहूर मार्गे शेंदुर्णीकडे प्रस्थान. सकाळी 11.30 वाजता शेंदुर्णी येथे आगमन व सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता शेंदुर्णी येथून पाचोरा- भडगाव मार्गे चाळीसगावकडे प्रयाण. (स्थानिक कार्यकर्त्यांची धावती भेट)

दुपारी 1.00 वाजता चाळीसगाव येथे आगमन, स्वागत व वरखेडेकडे रवाना. दुपारी 1.30 वाजता वरखेडी येथे आगमन व पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 मिनिटांनी वरखेडे येथून चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता चाळीसगाव येथे दिव्यांगांसाठी साहित्याचे वाटप. कार्यक्रम व सभा. दुपारी 4.30 वाजता श्री वर्धमान धारिवाल यांचे कार्यालयास भेट. दुपारी 4.45 वाजता श्रीमती मीनाक्षीताई निकम यांच्या घरी भेट. दुपारी 5.00 वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलश दर्शन व माल्यार्पण, संताजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण. सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून खाजगी मोटारीने औरंगाबादकडे रवाना.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!