स्व.रामभाऊंची संकल्पना आणि पालिकेचे योगदानाने डर्टी गांधलीपुरा परिसर झाला क्लीन!-आ.अनिल पाटील

0

▶️ कृषिभूषण मार्गासाठी 60 लाखांच्या निधीची घोषणा,प्रभाग चार मध्ये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) गांधलीपुरा भागातील कृषिभूषण मार्गाजवळील अत्यंत क्लीन परिसर पहिला की स्व.रामभाऊ अण्णा संदानशिव यांचीच आठवण येते कारण त्यांची संकल्पना आणि नगरपरिषदेचे योगदान यामुळेच हा एकेकाळी डर्टी असलेला परिसर अत्यंत क्लीन झाला असून आता या कृषिभूषण मार्गासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केल्याने या मार्गाने थेट विप्रो पर्यंत पोहोचता येईल अशी भावना आ.अनिल पाटील यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मध्ये गांधलीपुरा भागात सामाजिक व दुर्बल घटकांसाठी 5% राखीव निधी अंतर्गत कृषीभुषण मार्गावर व्यायाम शाळेचे ‘भुमिपुजन’ तसेच जिनगर गल्ली येथे कुरैशी व्यायाम शाळेच्या जिम साहित्य ‘लोकार्पण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित सॊहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव,नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी,नगरसेविका निशात बानो कुरैशी,फयाज पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आमदार अनिल पाटलांसह मान्यवरांचे याठिकाणी आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले,यावेळी आयोजित सोहळ्यात पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की शहर विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने आतापर्यंत तब्बल 15 कोटींचा निधी शहरासाठी उपलब्ध केला असून यातून भरीव अशी विकासकामे मार्गी लागली आहेत,शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी उद्यानासाठी आधी 50 लाखांची मंजुरी मिळविली असताना आता पुन्हा 50 लाख मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे,यामुळे ते उद्यान एक नवीन पिकनिक स्पॉट ठरणार आहे,निधीचा हा प्रवाह थांबणार नसल्याचे सांगत सदर व्यायामशाळेसह पारधी समाजाच्या व्यायामशाळेसाठी देखील जिम साहित्य देण्याची ग्वाही आमदारांनी दिली.व शेवटी या प्रभागाचे नगरसेवक नरेंद्र संदानशिव आणि निशात बानो कुरेशी यांच्या कामाचे विशेष कौतुक त्यांनी केले.कुरेशी व्यायामशाळेच्या जिम साहित्य लोकार्पण स्थळी देखील आमदारांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला,याठिकाणी मुस्लिम समाजासाठी देखील योगदान देण्याची ग्वाही आमदारांनी दिली.
यावेळी भरत सोनवणे
धनराज पारधी,पन्नालाल मावळे,आप्पा देवा पारधी,रफिक शेख महमंद ,अबिद मिस्तरी,नाविंद शेख,गुलाम नबी,हैदर मिस्तरी,रघु घोगले,गोपीचंद चव्हाण,साहेबराव साळुंखे,शब्बीर मामू,गंभीर पारधी,वामन भगत,पिंटू पारधी,गप्पा पहेलवान,वना मास्तर,कालु पहेलवान,दिनेश बिऱ्हाडे,अर्जुन गजरे,अशोक महाजन,रवि गढरे,ज्ञानेश्वर संदानशिव,विनोद बिऱ्हाडे,संजय बिऱ्हाडे यासह परिसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार सोमचंद संदानशिव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!