22 वर्षानंतर स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गौरव करत आणले एकत्र

▶️ शिक्षकवृदासाठी जैतपीरला विद्यार्थी कृतज्ञता ओशाळली
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर माध्यमिक विद्यालयाचे बावीस वर्षांपूर्वी चे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना बद्दल एक आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.. संत कबीर म्हणतात “गुरुबीन कोन दिखावे बाट!बहुत बडा यमघाट”. म्हणजेच जीवनातील उंच शिखरावर जाण्यासाठी गुरु म्हणजे शिक्षक हाच वाद सुरू आहे त्याच्या यशस्वी मार्गदर्शनाने कठीण यमघाट म्हणजे यशोशिखर गाठता येते. बावीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांनाबद्दल भेटून व कृतज्ञता व्यक्त करण्याची नियोजनपूर्वक अनेक विद्यार्थ्यांची आठ महिन्यापासून संपर्क करत अपूर्व भेट घडून आणली..
कार्यक्रमाचे अध्यक्ष के.टी गिरासे होते तर अतिथीरूपात स्कूल कमिटीचे चेअरमन अजबसिंह राजपूत ,व्हाईस चेअरमन विश्राम बागुल व गावातील शिक्षणप्रेमी शिक्षक वृंद अतिथी रूपात विराजमान झाले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माजीविद्यार्थी किरण सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षकांना फेटेबांधत गावात वाजत-गाजत नेऊन त्यांच्या केलेल्या कृतीची उजळणी करून त्यांच्या ऋणाची उतराई म्हणून विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या भेटीने आनंदाश्रू दोन्हींच्या नयनात विराजमान झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष के.टी. गिरासे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन हदय सत्कार माजी विद्यार्थी यांनी केला.शिक्षक पी.एस.विंचूरकर,शामीर पठाण,जी.एस.पाटील, ईश्वर महाजन, सुशिल चौधरी, अभय जैन,एम.एन पाटील, संजय चौधरी व शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद पाटील, लालसिंग राजपूत, रमेश पाटील यांचा माजी विद्यार्थी यांनी शाल,श्रीफळ, हार,स्मृतीचिन्ह देऊन सत्कार
जि.प.शाळा जैतपीर येथे झाला.शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी व रात्री जेवनाचा मान्यवरांनी अस्वाद घेतला.
स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात भव्य दिव्य केक कापून माजी विद्यार्थी व शिक्षकांनी गाणे म्हणत सेलीब्रेशन केले.माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अध्यापन व शिस्त याबाबत गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात के.टी गिरासे म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची भेट घडवून एक मोठी भेट दिली तर
आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मिळालेले यश व आपण ज्या पदावर कार्यरत आहात ते
पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील असे सांगितले. तर पी.एस विंचुरकर ,शामीर पठाण ,सुशील चौधरी ,जे एस पाटील यांनी सांगितले की माजी विद्यार्थ्यांनी आमचा हदय सत्कार करत आज आपण मुख्याध्यापक शिक्षक व सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून जुन्या आठवणींना उजाळा देत एक भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणला निश्चितच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असे सांगत माजी विद्यार्थ्यांचे व गावातील शिक्षणप्रेमी पालक यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, किरण पाटील, भागवत सैदाणे, प्रवीण मोरे, किरण सोनवणे, दिनेश बागुल, शरद खैरनार ,विजय शिंदे ,विनोद कुलकर्णी ,दीपक पाटील, दिलीप बागुल सह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ पोलीस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी जि.प शाळा जैतपीरचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार अरुण पाटील यांनी मानले.